आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने‎:कंत्राटी कर्मचारी संघटनेची‎ विविध मागण्यांसाठी निदर्शने‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार‎ हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या‎ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध‎ मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला‎ आहे. कर्मचारी बुधवारपासून बेमुदत‎ संपावर गेले असून, जिल्हाधिकारी‎ कार्यालयासमोर निदर्शने केली.‎ प्रलंबित मागण्यांसाठी १८ जानेवारी‎ रोजी कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप‎ केला, त्यानंतर २५ जानेवारीपासून‎ असहकार आंदोलन सुरू केले आहे.‎

आता पुढच्या टप्प्यात बेमुदत संपावर‎ जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.‎ याबाबत मग्रारोहयो अंतर्गत कार्यरत‎ सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक‎ सहायक क्लार्क कम डाटा एंट्री‎ ऑपरेटर संघटनेने ‘काम बंद’‎ आंदोलन सुरू केले आहे. या वेळी‎ प्रशांत साबळे, दीपक मेटे, गणेश गुंड,‎‎ समीर शेख, अविनाश परळकर,‎ नीलेश तनपुरे, सतीश दिघे, राहुल‎ भोसले, अक्षय नवले, राजश्री पाटील,‎ इंद्रायणी भारुडे, किरण करपे, किशोर‎ साळवे, संतोष शिंदे, नितीन हजारे,‎ बाळासाहेब शिंगाडे, प्रियांका चौधरी,‎ अक्षय दुधाळ, अतुल बनसोड,‎ विशाल पांढरे आदी उपस्थित होते.‎

मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून‎ कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे‎ आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात‎ यावे, पश्चिम बंगालच्या धर्तीवर‎ मानधन देण्यात यावे, योजनेतील सर्व‎ कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी‎ असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात‎ यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे‎ सप्टेंबर-२०१९ मधील मानधन‎ वाढीतील प्रलंबित फरकाची रक्कम‎ तात्काळ अदा करावी आदी मागण्या‎ केल्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...