आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक यांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली. आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची मोर्चे बांधणीला सुरुवात झाली. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या समर्थ बाबुराव पाटील सांस्कृतिक भवनात भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड तसेच पालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांच्या अधिपत्याखाली ही सोडत काढण्यात आली. यावेळी लहान मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभाग निहाय आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे : प्रभाग : १ अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण. प्रभाग : २ अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग : ३ अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण प्रभाग : ४ (३ जागा), अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, प्रभाग : ५ अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग : ६ अ अनुसूचित जमाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग : ७ अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग : ८ अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग : ९, अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग : १० अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण अशी सोडत झाली. आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी १५ जून ते २१ जून असणार आहे. आरक्षण सोडतीचा अहवाल संबंधित जाहीर होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.