आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील देवठाण गावातून अनेक वर्षांपासून चलती असलेले व अनेकदा तरूणांसह महिला व गावकऱ्यांनी आंदोलने करूनदेखील बंद न झालेले अवैध दारू विक्री, मटका व जुगार अड्डे गावातून हद्दपार करण्याचे कसब माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांनी यशस्वी करून दाखवले.
देवठाण गावात असलेले सर्व अवैध व्यवसाय व दारू गुत्ते कायमचे बंद न झाल्यास मी कायदा हातात घेऊन ते बंद करीन, असा पवित्रा घेत अरुण शेळके यांच्या आवाहनास सुरूवातीला अल्प प्रतिसाद मिळला. मात्र शेळके यांनी दारू विकणाऱ्या बेकायदेशीर दुकानावर स्वतःच जाऊन तेथील दारूचे बॉक्स उचलून घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात आणून पोलिसांत खबर देत कारवाईवर अडून राहिले. याचा परिणाम इतरांनीही आपली अवैध दुकानदारी गुंडाळून ठेवण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
सुमारे १० हजार लोकसंख्येतील देवठाण गाव व परिसरात अवैध व्यवसायिक व हप्तेखोर पोलिसांकडून अनेक वर्षांपासून ८ ते १० अवैध देशी विदेशी दारू दुकाने, मटका व जुगार खुलेआम चालवण्यात येत. देवठाण गावातून मोबाइल मटका व जुगार चालकांकडून ठिकठिकाणाहून तीनपानी व रमी जुगार खेळवण्यात येत. गोरगरीब लोक अधिक पैशाच्या अमिषाने कष्टाची कमाई यात गमवून बसत.
बेकायदेशीर दारू विकणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांच्याकडे गावकरी करीत. देवठाण विकास सोसायटीची निवडणूक तोंडावर आली असून संभाव्य उमेदवारांकडून मतदारांना दारूची ऑफर ही तळीरामांसाठी पर्वणीच ठरणार. कामधंदा न करताच वरकमाईला चटावलेल्या काही लाचखोर पुढारी व सोईस्कर कानाडोळा करणाऱ्या हप्तेखोर पोलिसांना हे अवैध व्यवसाय हवे होते. म्हणूनच ते बंद करण्याऐवजी सुरूच कसे राहतील याला पाठबळ मिळत. मात्र अवैध व्यवसायांला विरोध करून दारू विकणाऱ्यांवर अंकुश आणण्याचा चंगच अरुण शेळके व सहकाऱ्यांनी बांधला. देवठाण गावातून दारू विकणाऱ्यांकडील मुद्देमाल सर्वांसमक्ष उचलून देवठाण ग्रामपंचायतीत आणून तेथे पोलिस बोलावून पंचनामा केला. सपोनि मिथून घुगे यांनी धाव घेत अवैध व्यवसायांवर धडक कारवाई करून देवठाण गावातून अवैध दारू, जुगार, मटका हद्दपारीची कामगिरी केली. शेळके यांच्यासह सहभागी कार्यकर्त्यांच्या या सकारात्मक कृतीचे देवठाण ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे.
सकारात्मक कृतीचे देवठाण ग्रामस्थांकडून होतेय स्वागत
हा आमच्या नियमित कामगिरीचाच भाग
शेळके यांच्यासह समविचारी लोकांकडून पुढाकार घेऊन अवैध व्यवसायांवर निर्बंध आणण्यात पोलिस यंत्रणेस सहकार्य मिळाले. याबाबत पोलिसांकडून वारंवार कारवाई करण्यात येत होती. तरीदेखील पूर्ण अवैध व्यवसाय बंद करण्यास यश मिळत नव्हते. ते शेळके यांच्या नेतृत्वाखाली देवठाण गावातून मिळाले. हा आमच्या नियमित कामगिरीचाच एक भाग आहे. इतरही गावातून कोठे लपून छपून अवैध व्यवसाय होत असतील तर असेच सहकार्य गावकऱ्यांनी दिले तर तेथेही त्वरित कारवाई करण्यात येईल.'' मिथुन घुगे, सहाय्यक निरीक्षक, अकोल पोलिस ठाणे.
यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय
यावर्षी ग्रामस्थ आणि यात्रोत्सव समितीच्या संयुक्त सहभागातून अरुण शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. काशीमाता यात्रा व रामनिवमी संयुक्त यात्रोत्सव शुक्रवारी (८ एप्रिल) दुपारी ४ वाजता काशीमातेच्या मानाच्या काठीची मिरवणूक काढली. रात्री काळू बाळू नारायणगावकर लोकनाट्य तमाशाने मनोरंजन व लोककला सादर केली. शनिवारी (९ एप्रिल) सकाळी बैलांची टांगा शर्यत होईल. दुपारी ४ वाजता कुस्ती हगामा होईल. रविवारी (१० एप्रिल) रामनवमी साजरी होईल.'' पोपट दराडे, अध्यक्ष, देवठाण विकास सेवा सोसायटी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.