आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषिविषयक विकासकामांवर आदिवासी भागातून मोठे काम करता येईल एवढे पोटेन्शियल अकोले तालुक्यात आहे. आदिवासी भागातील बहुतांश शेतकरी पारंपरिक भातशेतीसोबतच आता नवनवीन पीक पद्धती विकसित करीत आहेत. कृषि उत्पन्नात वाढ होईल, असे जिरे, काळी मिरी, जिरेनियम, काजू, निळा भात, फूलशेती, मेथी, पालक, टोमॅटो, सोयाबीन व वेलवर्गीय भाज्या पिकवून बागायत शेती करू लागले आहेत. आदिवासी शेतकऱ्यांना फक्त भातशेती एके भातशेतीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यास कृषि विभागाला यश मिळताना दिसत आहे. याचे खरे श्रेय शेतकऱ्यांसह तालुक्यातील कृषि खात्यास जाते, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.
शासनाच्या कृषि विभागातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार डॉ. लहामटे यांनी हस्ते अंबिका मंगल कार्यालयात सुरेश पोखरकर व ज्योती पोखरकर यांचा सपत्नीक सत्कार केला. या सेवा पूर्ती सोहळ्यात आमदार डॉ. लहामटे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर होते. व्यासपीठावरील अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले, कम्युनिस्ट पक्षाचे नेते कारभारी उगले, काँग्रेसचे नेते मीनानाथ पांडे, जि.प. भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, तालुका कृषि अधिकारी प्रवीण गोसावी यावेळी भाषणे झाली. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, जि.प. सदस्या सुनिता भांगरे, अगस्ति कारखान्याचे संचालक प्रकाश मालुंजकर, महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ, अशोक देशमुख, अशोक आरोटे, भानुदास तिकांडे, भाऊपाटील नवले, सतीश नाईकवाडी, शिरीष नाईकवाडी, संपत नाईकवाडी, बाळासाहेब नाईकवाडी, मंदाबाई नवले, प्रा. मारूती वाकचौरे, माजी उपसभापती मारूती मेंगाळ, स्वाभिमानी शेतकरीचे तालुकाध्यक्ष सुरेश नवले, नगरसेवक शितल वैद्य, नवनाथ शेटे, आरीफ शेख, अॅड सदानंद पोखरकर उपस्थित होते. जिल्हा बँकेचे निवृत्त व्यवस्थापक भानुदास पोखरकर यांनी आभार मानले सूत्रसंचालन अमोल वैद्य व सयाजी पोखरकर यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.