आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिंडी चालली चालली:देवगड दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारकऱ्यांत उत्साह

नेवासे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र देवगड येथील श्रीसमर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या आषाढी पायी वारी दिंडीचे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी पहाटेच्या श्रीगुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

पहाटे प्रस्थानापूर्वी भगवान दत्तात्रय व श्रीसदगुरू किसनगिरीजी बाबा यांच्या समाधीचे विधिवत पूजन वेदमंत्राच्या जयघोषात गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीदत्त मंदिर देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज हे करत असून दिंडीमध्ये फक्त सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुका दर्शनासाठी बरोबर घेण्यात आल्या आहेत. दिंडीमध्ये विणेकरी नारायण महाराज ससे, गायनाचार्य रामनाथ महाराज पवार, बाळकृष्ण महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, लक्ष्मण महाराज नांगरे यांच्यासह तेरा ते चौदा वारकऱ्यांचा समावेश आहे. देवगड दिंडीचे मुरमे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अजय साबळे, कविता साबळे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे, रामकृष्ण मुरदारे, मारुती साबळे यांनी स्वागत केले. त्यानंतर बकुपिंपळगाव, देवगडफाटा येथे राजेंद्र गिते, पत्रकार इक्बाल शेख यांनी स्वागत केले. खडकाफाटा व घाडगे पाटील यांच्या त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात अल्पोपहार देऊन स्वागत करण्यात आले. नेवासेफाटा येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, कृषीतज्ञ एकनाथ भगत, दीपक शिंदे, नेवासे प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण, पत्रकार शंकरराव नाबदे, पत्रकार सुहास पठाडे, पत्रकार संदीप वाखुरे, मंगेश निकम यांनी स्वागत केले. हंडीनिमगावच्या त्रिवेणीश्वर मंदिरात दिंडी विसाव्यासाठी थांबली असता महंत रमेशानंदगिरी महाराज, सुरेशनगरचे सरपंच पांडुरंग उभेदळ, अनिता उभेदळ, हंडीनिमगावचे सरपंच अण्णासाहेब जावळे, भिवाजी आघाव यांनी स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...