आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिंडी सोहळा:गोरक्षनाथ गडावरून बुधवारी दिंडीचे प्रस्थान

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असणाऱ्या मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गडावरून बुधवारी (२९ जून) श्रीक्षेत्र गोरक्षनाथ गड ते पंढरपूर आषाडी दिंडी सोहळा प्रस्थान करणार आहे.वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज कदम यांनी प्रारंभ केलेली व राम महाराज पोते,गोरक्षनाथ महाराज ढोकणे, भाऊसाहेब महाराज हरिश्चंद्रे व दिंडी सोहळा ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भगिरी डोंगर रांगेतील नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ गड येथून बुधवारी सकाळी ११ वाजता निघणार आहे. यावेळी अनेक मान्यवरां बरोबर महामंडलेश्वर १००८ स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वती, तुळशीराम महाराज लबडे, सदाशिव महाराज गीते, मच्छिंद्र महाराज गायकवाड, दत्ता महाराज सोळुंके आदी उपस्थित राहणार आहेत.