आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बारा जणांवर हद्दपारीची कारवाई; टिपू सुलतान जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या प्रस्तावानुसार दंडाधिकाऱ्यांचे आदेश

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याच्या तयारीत असलेल्या १२ जणांना तीन दिवसांसाठी नगर शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. कोतवाली पोलिसांच्या प्रस्तावानुसार उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी ही कारवाई केली आहे.शाह फैसल बुऱ्हाण सय्यद, सरफराज इब्राहीम शेख, कासिम इब्राहीम शेख, तैजीब आरीफ शेख, सलमान मोहम्मद मुश्ताक शेख, अशरफ नफीस अहमद शेख, अजीम नुरमोहम्मद राजे, नईम सरदार शेख, शरीफउद्दीन सय्यद, अल्तमश सलीम शेख ऊर्फ जरीवाला, आबिद हुसेन मोहम्मद हनीफ शेख, शाहबाज उर्फ बॉक्सर इक्बाल शेख या बारा जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

रविवारी टिपू सुलतान जयंतीनिमित्त नगर शहरातून मिरवणूक काढण्याची तयारी सुरू आहे. पोलिस प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारली आहे. त्यानंतरही मिरवणूक काढण्याची शक्यता असल्याने व यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोतवाली पोलिसांनी १२ जणांवर सीआरपीसी कलम १४४(२) अन्वये कारवाईचा प्रस्ताव दिला होता. उपविभागीय दंडाधिऱ्यांनी या १२ जणांना १९ ते २१ नोव्हेंबर या तीन दिवसांसाठी नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प, नगर तालुका व सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार केले आहे. कोतवाली पोलिसांमार्फत या आदेशाची बजावणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...