आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशनाला उपस्थिती:उपमुख्यमंत्री फडणवीस रविवारी नगर शहरात

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन नगरमध्ये ६ व ७ नोव्हेंबर रोजी होत आहे. शहरातील सहकार सभागृह येथे रविवारी (६ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाचे सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, अधिवेशनाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर आदींसह जिल्ह्यातील खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या राज्यस्तरीय अधिवेशनात मुख्याध्यापकांचे प्रलंबित प्रश्न व मागण्या सोडवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. राज्यातून सुमारे दोन हजार मुख्याध्यापक या अधिवेशनास उपस्थित राहतील, अशी माहिती स्वागताध्यक्ष व मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा,सुनील पंडीत यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...