आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:साई संस्थानच्या कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

शिर्डी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी संस्थानच्या कामगारांना कायम करण्यासंदर्भातील प्रश्न लवकरच निकाली काढू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी दिले. भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांच्या सागर या निवासस्थानी साईबाबा संस्थानच्या कामगारांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नेले होते. यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण विषय समजून घेऊन सकारात्मक प्रतिसाद देऊन मंत्रालयात गेल्यावर मला या विषयाची आठवण करून द्या, असे आदेश स्वीय सहाय्यकांना दिले. तसेच ४० टक्के पगारावाढीचा प्रस्ताव आपल्या विभागाकडे आला असून तोही तत्काळ मंजूर करून कामगारांची पदस्थापना होऊन कायम होईपर्यंत ४० टक्के पगारवाढ देण्यात यावी, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिर्डी संस्थानच्या कामगारांच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा शाल व साईंबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विजय गुंजाळ, अनिल आहेर, सुभाष वाघमारे, विशाल दहीवाड, संदीप आहेर, गणपत तुरकणे, बाबासाहेब निलक, नजीर शेख, भाऊसाहेब थोरात, संभाजी गोंदकर, रामदास धिवर, संदीप बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते.

४० टक्के पगारावाढीचा विभागाकडे आलेला प्रस्ताव मंजूर करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण विषय समजून घेऊन सकारात्मक प्रतिसाद देऊन मंत्रालयात गेल्यावर मला या विषयाची आठवण करून द्या, असे आदेश स्वीय सहाय्यकांना दिले. तसेच ४० टक्के पगारावाढीचा प्रस्ताव आपल्या विभागाकडे आला असून तोही तत्काळ मंजूर करून कामगारांची पदस्थापना होऊन कायम होईपर्यंत ४० टक्के पगारवाढ देण्यात यावी, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिर्डी संस्थानच्या कामगारांच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा शाल व साईंबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विजय गुंजाळ, अनिल आहेर, सुभाष वाघमारे, विशाल दहीवाड, संदीप आहेर, गणपत तुरकणे, बाबासाहेब निलक, नजीर शेख, भाऊसाहेब थोरात, संभाजी गोंदकर, रामदास धिवर, संदीप बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २२ वर्षांपासून साईबाबांची सेवा करीत असताना कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भातील प्रश्नावर सातत्याने दुर्लक्ष होत आले. या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ठोस निर्णय घेण्यात यावा. २००४ साली आम्ही शिर्डी ते मंत्रालय अशी पायी दींडी काढण्याचे आंदोलनाची घोषणा केल्यानंतर १०५२ कामगारांना न्याय मिळाला. संस्थानने उर्वरित कामगारांना टप्प्याटप्प्याने घेऊ, असे आश्वासन दिले होते. परंतु बरेच कामगार निवृत्त झाले, तरी ते झाले नाही. गेल्या २० वर्षांपासून कामगारांना तुटपुंजा पगार मिळतो. सध्याच्या महागाईच्या काळात सन २००० पासून शिर्डी संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या तुटपुंज्या वेतनावर काम करतात. सदर पगारावर घरखर्च तसेच मुलांचे शिक्षण करणेही जिकरीचे झाले. मिळणाऱ्या पगारात भागत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी अन्याय सोसत आहेत. त्यांतील काही रिकाम्या हाताने सेवानिवृत्त झाले.

कामगारांचा प्रश्न लवकर सुटेल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी शिर्डी संस्थानच्या कामगारांविषयी सकारात्मक चर्चा झाली. २२ वर्षांपासून सेवेत असूनही यापूर्वीच त्यांना न्याय मिळायला हवा होता. फडणवीस यांच्याकडेच न्याय व विधी खाते असल्याने ते हा प्रश्न निकाली काढतील. कामगारांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर यातील सकारात्मकता उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ त्यांचा स्वीय सहाय्यकांना सांगून यासंदर्भातील मंत्रालयीन नोट तयार करून हा विषय अजेंड्यावर घेण्यास सांगितला. कामगारांचा प्रश्न उपमुख्यमंत्री सोडवतील, असा विश्वास डॉ. पिपाडा यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...