आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीपाद छिंदम वर्षभरासाठी हद्दपार:जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश, छत्रपती शिवरायांबद्दल केले होते वादग्रस्त वक्तव्य

अहमदनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्यासह त्यांचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांना एक वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

भाजपचा उपमहापौर असताना श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरात असंतोष पसरला होता. राज्यात सर्वत्र त्याच्याविरोधात मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांच्याविरुद्ध नगर शहरात संघटीतपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करून दुखापत करणे, गंभीर दुखापत रक्कम बळजबरीने काढून घेणे, ठार मारण्याची धमकी देणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, धार्मीक भावना दुखावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, अनाधिकाराने मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहरात दहशत निर्माण श्रीपाद शंकर छिंदम व सदस्य श्रीकांत शंकर छिंदम (रा. मोहनबाग, दिल्लीगेट) यांना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यातून 1 वर्षाकरीता हद्दपार केले आहे.

छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दोघांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठवला होता. अधीक्षक पाटील यांनी त्याला मंजुरी देत दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

बातम्या आणखी आहेत...