आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे व भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक:सावरकरांविषयी अपमानजनक वक्तव्य; गांधींंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

शेवगाव शहर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बाबत अपमान जनक वक्तव्य केल्याचा निषेध करत मनसे व भाजप कार्यकर्त्यांनी शेवगाव शहरातील क्रांती चौकात राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा बाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. याप्रकरणी मनसे व भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली.

गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करत हिंदू समाज व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घ्यायचे, संघाने ब्रिटिशांना मदत केली अशा प्रकारची चुकीची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी असे चुकीचे वक्तव्य करणे त्वरित थांबवावे,अन्यथा येणाऱ्या काळात यापेक्षा ही अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. यावेळी आंदोलकांनी गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन केले.

यावेळी मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष रांधवणे, भाजपचे सुनील रासने, शहराध्यक्ष रविन्द्र सुरवसे, मनसेचे शेवगाव तालुका उपाध्यक्ष देविदास हुशार, दिलीप सुपारे, गणेश डोमकावळे, केशव भुजबळ, डॉ. नीरज लांडे, महेश फलके, अण्णासाहेब ढोबळे, जगदीश धूत, ज्ञानेश्वर देहाडराय, बापू धनवडे, मच्छिंद्र भडके, किरण काथवटे, अमोल माने उपस्थित होते. यावेळी सहायक पोलिस निरिक्षक विश्वास पावरा,गुप्त वार्ताचे बप्पासाहेब धाकतोडे, कॉन्स्टेबल अशोक लिपने, प्रविण बागूल यांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...