आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा:तब्बल 252 कोटी रुपये खर्चूनही नगर शहरात पाण्याचे दुर्भिक्ष कायम ; राजकीय दबावामुळे नियोजनाचा बोजबारा

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने शहराच्या पाणीपुरवठा योजनांवर आजतागायत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. केडगाव, शहर (फेज टू) व आता अमृत पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, त्यानंतरही नगर शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य कायमच आहे. मुळा धरणात तब्बल पुरेसा पाणी उपलब्ध आहे. असे असतानाही शहरात अनेक वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक भागात आजही आवश्यक प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. सावेडी उपनगर परिसरात तर चक्क टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. पाणी पुरवठा योजनेत सुधार होण्यासाठी व वाढत्या विस्तारीकरणाला नुसार नागरिकांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाकडून पाणीपुरवठा योजना व पाण्याच्या इतर कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. युआयडीएसएसएमटी तसेच अमृत अभियान अंतर्गत सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पाणी योजना शहरात राबविण्यात आल्या. संपूर्ण शहरात नव्याने पाइपलाइन टाकण्यात आली. पाणी उपसा वाढवण्यासाठी नवीन पंप बसवले गेले. नवीन टाक्यांची उभारणी झाली. मात्र, एवढे करूनही नियोजनाचा अभाव असल्याने नगर शहरातील पाणीप्रश्न आजही कायमच आहे. धरणात पाणीसाठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध असतानाही नगरकरांना एक दिवसाआडच पाणी मिळतेय. ‘फेज टू’ अंतर्गत टाकण्यात आलेल्या नवीन जलवाहिन्यांची तपासणी न करताच त्याचा वापर अनेक ठिकाणी सुरू झाला आहे. काही ठिकाणी त्या फुटण्याचे प्रकारही घडले आहेत. सावेडी उपनगर परिसरात फेज टू च्या लाईनवरून कनेक्शन घेऊनही पाणी मिळत नाही. पाण्याची ही स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती असल्यामुळे पाणी योजनांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च संशोधनाचा विषय ठरला आहे.

केडगावला ४० कोटी खर्चूनही तीन दिवसांनी पाणी केडगाव उपनगर परिसरात स्वतंत्र पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी स्वतंत्र पाणी योजना राबवून त्यासाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याउपरही या भागात सद्यस्थितीत ३ दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. केडगावच्या वाढीव भागात सात ते आठ दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.

कल्याण रोडचा पाणीप्रश्न सुटेना! नगर शहर व सावेडी उपनगरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असला, तरी कल्याण रोड परिसरात मात्र ७ ते ८ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न विविध प्रयत्न करूनही आज कायमच आहे. विविध उपाययोजना करूनही टाकीत पाणी पडत नसल्याने पाणी योजनेच्या आराखड्यावर सवाल उपस्थित होत आहे.

पाणी योजनांवरील खर्च {केडगाव : ४४ कोटी खर्च : ४० कोटी { शहर : १२३ कोटी खर्च : १०७ कोटी { अमृत : १३० कोटी खर्च : १०५ : कोटी

बातम्या आणखी आहेत...