आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:लाखो रुपये खर्चूनही विसर्जन मार्गावर खड्डेच, पावसामुळे मनपाने केलेले पॅचिंगही गेले वाहून

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लाखो रुपये खर्चून विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्डे बुजविले होते. मात्र, गणेशोत्सवात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेने केलेले पॅचिंग वाहून गेले. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीवेळी संपूर्ण रस्त्यावर खड्डे कायमच होते.

मध्यवर्ती शहरातील बहुतांशी रस्त्यांची कामे राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर आहेत. बांधकाम विभागाकडून ही कामे केली जात नसल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असूनही शासनाचा बांधकाम विभाग काम करत नसल्याने महापालिका प्रशासनाला या रस्त्यांवर डागडुजीसाठी लाखोंचा खर्च करावा लागत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपाने शहरातील प्रमुख रस्ते व विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. अनेक ठिकाणी कामही पूर्ण झाले. मात्र, गणेशोत्सवात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेने केलेले पॅचिंग वाहून गेले. त्यामुळे विसर्जन मिरवणूक मार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य होते. दरम्यान, महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी केलेला खर्चही यामुळे वाया गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...