आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लम्पी त्वचाराेगामुळे जिल्ह्यात ५० हजार जनावरे बाधीत झाली. या साथ रोगाचा दूध उत्पादनावर परिणाम होण्याची धास्ती होती. मागीलवर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये दररोज ४२ लाख ५३ हजार लिटर दररोजचे दूध उत्पादन होते. लम्पीचा प्रादूर्भाव ऑगस्ट २०२२ नंतर झपाट्याने झाला. परंतु, एकीकडे लम्पीचा फैलाव वाढत असतानाही सद्यस्थितीत दैनंदिन उत्पादन, ४४ लाख २६ हजार लिटरपर्यंत पोहोचले आहे. लम्पीमुळे प्रशासनाने जनावरांच्या खरेदी विक्रीचे बाजार बंद केले होते. पहिल्या टप्प्यात सप्टेंबर २०२२ मध्ये ८५० जनावरांना बाधा होऊन ३३ जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद होती.
त्यानंतर जानेवारी २०२३ अखेर अवघ्या चार महिन्यात बाधित जनावरांचा आकडा तब्बल ५० हजारांवर पोहचला, तर मृत्युचा आकड्याने ४ हजारी गाठली. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने दूध उत्पादनावर झालेला परिणाम तपासण्यासाठी दुग्धविकास अधिकाऱ्यांकडे असलेल्या वर्षभरातील दैनंदिन दूध संकलनाची माहिती घेतली. लम्पीचा फैलाव वाढत असताना दुध उत्पादन घटले नाही, या उलट या व्यवसायात सातत्याने वाढ होत असल्याचे तथ्य समोर आले. लम्पीचा फैलाव नसताना, आॅक्टोबर २०२१ मध्ये ४०.२५ लाख तर सप्टेंबर २०२१ मध्ये दररोज ४३ लाख दूध उत्पादन होत होते.
गायीच्या दुधाला मिळतोय ३२ ते ३७ रूपये लिटरचा भाव दुधदरवाढ दूध उत्पादनास पोषक ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला जुलै २०२२ मध्ये प्रतिलिटर ३२ ते ३५ रूपये दर होता. राहुरी दुध संघांनी त्यावेळी सर्वाधिक ३५ रूपये दर दिला होता. तर डिसेंबर २०२२ मध्ये याच दुधाला ३५ ते ३७ चा भाव दर्जेदार दुधाला मिळत आहे. त्यामुळे अनेकजण पशुपालनाकडे वळत असल्याने उत्पादन वाढते आहे.
लम्पीचा दूध उत्पादनावर परिणाम नाही दोन संकलन केंद्राची अपडेट डिसेंबरमध्ये प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या महिन्यातील नोंदीनुसार ४० ते १५ लाख दैनंदिन उत्पादन दिसते. प्रत्यक्षात हे उत्पादन ४४ लाखांवर आहे. लम्पीचा प्रादुर्भावचा परिणाम जिल्ह्यातील दूध उत्पादनावर दिसून आला नाही. डॉ. व्ही. एम. गारूडकर, दुग्धविकास अधिकारी.
दररोज १४ कोटी ८ लाखांचे दूध दुधाचे दर सरासरी ३२ ते ३७ रूपये प्रतिलिटरला मिळत आहे. जिल्ह्यात सुमारे ४४ लाख लिटरचे दैनंदिन दूध उत्पादन होते. या दुधाला सरासरी ३२ रूपये दर गृहित धरला तरी दैनंदिन दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आकडा तब्बल १४ कोटी ८ लाखांवर पोहोचला आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणात दूध व्यवसायाच्या महत्त्वाच्या स्थानी पोहोचला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.