आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवाढीसाठी लढा उभारण्याचा निर्धार

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने एसटीचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांचे अभिष्टचिंतन करुन सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या पेन्शनवाढसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तर प्रलंबीत प्रश्‍न मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलनाचा लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. एसटीचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या वाढदिवसानिमित्त टिळकरोड येथील श्रमिक कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी केवटे यांचा सत्कार त्यांना ११ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे केंद्रीय सदस्य दिनकरराव लिपाने, एन.डी. कासार, ए.जी. जाधव, जिल्हा सचिव गोरख बेळगे, जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, मुख्य दक्षता अधिकारी कॅप्टन प्रभाकर चौधरी, विठ्ठल देवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकात बलभिम कुबडे यांनी अल्प पेन्शनमुळे महागाईच्या काळात एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना जगणे अवघड झाले आहे. पेन्शनवाढ आवश्यक व न्याय मागणी असून, यासाठी लढा द्यावा लागणार आहे. या मागणीसाठी २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सावेडी येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात निवेदन देण्यात येणार असून, यासाठी सर्व एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...