आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑल इंडिया स्पर्धेसाठी निवड:पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत देवाशिष भोसले ठरला बॉडीलाईन श्रीचा मानकरी

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर पॉवर लिफ्टींग असोसिएशन, महाराष्ट्र पॉवरलिफ्टींग असोसिएशन संलग्न इंडियन पॉवर लिफ्टींग फेडरेशन व बी बॉडीलाईन फिटनेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या बी बॉडीलाईन पॉवर लिफ्टींग स्पर्धेत येथील देवाशिष भोसले या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकावला. तो ‘बी बॉडीलाईन श्री २०२२’चा मानकरी ठरला.

टिळक रोड येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते त्यास पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कोच दगडू गव्हाळे, शेख हनिफ इस्माईल आदींनी काम पाहिले. देवशिष भोसले याची चेन्नई येथे १४ सप्टेंबर २०२२ रोजी होणाऱ्या ऑल इंडिया स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तो मिस्टर इंडिया अजय भोसले यांचा मुलगा आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...