आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिक व जनतेशी समन्वय साधून विकास:सत्ता असो वा नसो कामांचे नियोजन करु, नूतन तालुका अध्यक्ष डॉ. श्रीकांत पठारेंची ग्वाही

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ता असो वा नसो विकास कामांचे नियोजन सातत्याने होत असते. यासाठी पाठपुरावा महत्त्वाचा आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुखपद देऊन पक्षश्रेष्ठींनी आपल्या कार्याची दखल घेतली आहे. यापुढे सुद्धा शिवसैनिकांशी व जनतेशी समन्वय साधून विकासकामे करू, अशी ग्वाही शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी दिली.

पारनेर तालुक्यातील निघोज व परिसरातील शिवसैनिक व ग्रामस्थ यांच्यांशी संवाद साधण्यासाठी ते गुरुवारी आले होते. त्यांनी मळगंगा मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा ट्रस्टचे विश्वस्त बबनराव ससाणे व ज्येष्ठ ग्रामस्थ पांडुरंग लंके यांच्या हस्ते शिवसेनेचे नूतन तालुकाप्रमुख डॉ. पठारे यांचा सत्कार करण्यात आला.

शिवसैनिकांची उपस्थिती

यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त शिवाजीराव वराळ, संतोष रसाळ, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख बाबाजी तनपुरे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, रंगनाथ ढवण, सचिन ढवण, संतोष लाळगे, संपत वराळ आदी तसेच ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. पठारे म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून गेली पंधरा ते वीस वर्षात मोठ्या प्रमाणात तालुक्यात विकासकामे झाली आहेत. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी विधानसभा सदस्य असताना राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.

मोठ्या प्रमाणात विकासकामे

तसेच शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेली अडीच वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करुन राज्याचा नावलौकिक देशात वाढवला आहे. आगामी काळातही पक्षाची ध्येय धोरणे राबवून तालुक्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू तसेच विविध विकास कामांसाठी पाठपुरावा करू असेही डॉ. पठारे यावेळी म्हणाले.

विकासकामे हाच पक्षीय अजेंडा

विकासकामे हाच आपला पक्षीय अजेंडा आहे्. शिवसेनेच्या माध्यमातून विकासकामे करीत तालुका विकासाभिमुख करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे आश्वासन शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...