आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वत्कव्य:विकासाचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही : आ. काळे

कोपरगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही निवडून दिलेले उमेदवार तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे फिरकले नाहीत, त्यामुळे तुमचे विकासाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यासाठी येणाऱ्या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत मी दिलेले, माझ्या विचाराचे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून द्या, तुमच्या विकासाचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव शहरातील हनुमान नगर येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नामदार तुमच्या दारी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना काळे बोलत होते. ते म्हणाले, कोपरगाव शहरातील नागरिकांचा मुख्य प्रश्न हा पाणी प्रश्न आहे हा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी महा विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव शहराच्या नवीन पाच नंबर साठवण तलाव व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपये निधी महाविकास आघाडी सरकारने दिला आहे.

विकासकामांसाठी निधी आणून विकास करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते ते कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतांना मतदारसंघासाठी आणलेल्या हजारो कोटी रुपयांच्या निधीतून मतदारसंघाची विकासाच्या बाबतीत वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही निवडून दिलेले उमेदवारांनी देखील विकास करणे तुम्हाला अपेक्षित होते मात्र तुमचा भ्रमनिरास झाला आहे याची मला जाणीव आहे. मात्र तुम्हाला झालेली चूक सुधारण्याची व आपल्या प्रभागाचा विकास करण्याची नामी संधी कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीतून प्राप्त होणार आहे तुम्ही मिळालेल्या संधीतून मी दिलेले, विकासाशी बांधील असलेले, माझ्या विचाराचे उमेदवार निवडून द्या तुमच्या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उपस्थित नागरिकांना आमदार काळे यांनी दिला. याप्रसंगी मुख्याधिकारी शांतराम गोसावी, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, नायब तहसीलदार माधवी गोरे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पुरवठा अधिकारी दिपक भिंगारदिवे, पाणी पुरवठा अधिकारी ऋतुजा पाटील, शिक्षण प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक मंदार पहाडे, प्रतिभा शिलेदार, उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...