आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या समृद्धीचा नागपुर-मुंबई महामार्ग तयार करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नागपूर येथून शिर्डी पर्यंत समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा केला. त्याप्रसंगी तालुक्याच्या कोकमठान तीनचारी येथील हद्दीत भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी स्वागत केले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या हिंदूहदयसम्राट सरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला करणार आहेत. तालुक्याच्या ११ गावाच्या हददीतून हा महामार्ग गेला. त्याबाबत विरोधकांनी सुरुवातीला शेतकऱ्यांमध्ये गैससमज पसवले. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भूसंपादन केल्या जाणाऱ्या सुपिक जमिनीबद्दल शेतकऱ्यांना पाचपट वाढीव मोबदला मिळावा ही मागणी आपण केली. त्याबाबत अधिवेशन तसेच मंत्रालय स्तरावर बैठका घेतल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी व भावना सांगितल्या.
नागपुर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे कार्गो शेतीचे स्वप्न पुर्ण होईल. काकडी विमानतळ आणि समृद्धीचा बाळासाहेब ठाकरे महामार्ग शेती उत्पादनाला यातून चांगलीच किंमत मिळवून हेईल. बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी, फळे, फुले व भाजीपाला पिकवणारा शेतकरी या महामार्गातून अधिक समृद्ध होईल. प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपला प्रयत्न आहे. शिर्डी साईबाबा धार्मिक स्थळाला भेटी देणाऱ्या भाविकांसह पर्यटकांना या महामार्गाचा फायदा होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता पूर्ण ताकदीने रस्त्यांच्या प्रश्नांत लक्ष घालून त्यातून समृद्धी वाढविण्यासाठी सुरु केलेले योगदान मोठे आहे. शिंदे- फडणवीस शासनाचे व समृद्धी महामार्गाचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार व सर्व अधिकारी कौतुकास पात्र आहे असेही कोल्हे म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.