आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर:देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षे गृहखाते सांभाळले, मात्र सुशांह सिंह प्रकरणात त्यांचाच पोलिसांवर विश्वास नाही; हसन मुश्रीफांनी लगावला टोला

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे, मृत्यूदर कमी करणे आव्हान - मुश्रीफ

राज्यात सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून चांगलेच राजकारण तापले आहे. याप्रकरणी सीबीआयची चौकशी व्हावी अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ही मागणी केली आहे. यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. ज्यांनी 5 वर्षे राज्याचे गृहखाते सांभाळले त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही, असे मुश्रीम म्हणाले. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगरला ध्वजारोहण पार पडले. यावेळी ते बोलत होते.

सुशांत सिंह प्रकरणात राजकारण

हसन मुश्रीफ म्हणाले की, ''देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. यातून हे राजकारण असल्याचे दिसून येते. देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षे गृहखाते सांभाळले, मात्र आता तेच आपल्या पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत, हे दुर्दैव आहे.''

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरही केले भाष्य

यावेळी हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, ''आपल्यासमोर सध्या कोरोनाचे आव्हान आहे. हा प्रादुर्भाव रोखणे, मृत्यूदर कमी करणे, जी अत्यवस्थ रुग्णांसाठी ताबडतोब बेड मिळतील अशी व्यवस्था करणे, जास्तीत जास्त रुग्णांना लवकर बरे करणे हेच आज आपल्यासमोरचे आव्हान असून यासाठी काम सुरु आहे.''

बातम्या आणखी आहेत...