आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊत आणि नाना पटोले हे दोन्ही लोक बोलघेवडे लोक आहेत. अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दोघांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची मला आवश्यकता वाटत नाही. असे फडणवीस म्हणाले. अहमदनगरमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. असे बोलून त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली.
वाद असला तरी वादळ नाही
कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यात वाद आहे, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर फडणवीस म्हणाले की, असे काहीही नाही. आणि असे काही असेल तर मी बसलेलो आहे. त्यांच्यात समन्वय घडवून आणला जाईल. दुसरी बाब म्हणजे वाद असला तरी वादळ नाही, एवढे मात्र नक्की आहे.
तक्रारी असतील तर चौकशी करू
जलजीवन मिशन योजनेची कामांना केंद्राने निधी दिला. परंतू त्याचे सर्व टेंडर हे महाविकास आघाडीच्या काळात निघाली आहे. त्यामुळे या कामात काही घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कुठेही भाष्य नाही, कपोलकल्पित बातम्या
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी कुठेही युतीवर भाष्य केलेले नाही. या सर्व कपोलकल्पित बातम्या आहेत. जागावाटपाबाबत कोणतेही चर्चा नाही. जेव्हा चर्चा निर्णय होईल. तेव्हा तुम्हाला कळविले जाईल. आमच्या युतीत कोणताही वाद नाही. असे फडणवीस म्हणाले. शिंदे सेनेकडून लोकसभेसाठी 22 जागांचा दावा केला जातोय? असा प्रश्न फडणवीस यांना केल्यावर ते म्हणाले की, आता कोणतेही चर्चा नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका.
कोण संजय राऊत?
पत्रकारांनी संजय राऊत यांच्या प्रतिक्रियांवर प्रश्न करताच फडणवीस यांनी दोन वेळा कोण संजय राऊत, कोण संजय राऊत असे म्हणत प्रश्नाला बगल दिला.
विविध योजनांचा आढावा घेतला
पंतप्रधान आवास योजना, एससी आणि एसटी प्रवर्गातील घरकुल योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिणी योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच टप्प्यात नगर जिल्हा सौरऊर्जेवर आणू. 800 फीडरसाठी जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत. जमी मोजणीची कामे पेंडन्सी असायची. आता मोजणी संपूर्ण ऑनलाईन केली जाणार आहे. शेतकर्यांना मोठा फायदा होईल.
हे ही वाचा
घरचा आहेर:भाजप कार्यकर्त्यांचा देवेंद्र फडणवीस यांना आंदोलनाचा इशारा; सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डच्या मोबदल्यासाठी आक्रमक
सोलापूरमधल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घरचा आहे दिला. सुरत - चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेचा वाढीव मोबदला द्या. अन्यथा थेट सरकारविरोधात उपोषण सुरू करू, असा इशारा आक्रमक कार्यकर्त्यांनी दिला. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.