आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Devendra Fadnavis's Challenge To Make 'unhealthy' BJP 'healthy'? In Implementing A Different Pattern Than BJP, MP Dr. Sujay Vikhe's Emphasis On Discomfort In Loyalty | Marathi News

राजकारण:‘अस्वस्थ’ भाजपला ‘स्वस्थ’ करण्याचे देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आव्हान? भाजपपेक्षा विखे पॅटर्न राबवण्यात खासदार डॉ. सुजय विखे यांनी भर दिल्यानेच निष्ठावंतात अस्वस्थता

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पाच जागा गमावल्यानंतर भाजपमध्ये आलेली मरगळ व लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले व पूर्वाश्रमीचे काँग्रेसजन असलेले खासदार डॉ. सुजय विखे यांच्या स्वतंत्र विखे पॅटर्नमुळे निर्माण झालेल्या स्थानिक भाजपमधील अस्वस्थतेमुळे नगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून थेट राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी पडल्याने त्यांच्यासमोर “अस्वस्थ’ भाजपला ‘स्वस्थ’ भाजप अर्थात पुन्हा निष्ठावंतांची भाजप निर्माण करण्याचे मोठे आवाहन राहणार आहे.

राज्याच्या राजकारणात कुठल्याही पक्षाची सत्ता असताना नेहमीच प्रभाव राहिला, तो नगर जिल्ह्याचा. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेच्या कालावधीत देखील तीन मंत्री नगर जिल्ह्याला लाभले. आता ही महाविकास आघाडीच्या सत्तेत नगर जिल्ह्याकडे तीन मंत्रीपद आहेत. तीन मंत्रिपदी असूनही पालकमंत्र्यांची प्रतिक्षा प्रशासनाबरोबरच नेत्यांना करावी लागते. राजकारण्यांचा जिल्हा अशी नेहमीच नगरची ओळख राहिली. राजकारण्यांच्या या नगर जिल्ह्यात यापूर्वी भाजपकडे आठ विधानसभा मतदारसंघ होते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही पाच जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. कर्जत-जामखेड हा विधानसभा मतदारसंघ कायम भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे उभे राहिल्याने या जागेवर माजी मंत्री राम शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तिच परिस्थिती हक्कांच्या जागा असलेल्या नेवासे, कोपरगाव, राहुरी या तीन मतदारसंघात देखील झाली. अकोले मतदारसंघात देखील पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. केवळ राहाता, शेवगाव पाथर्डी व श्रीगोंदे या तीन मतदारसंघातच भाजपला यश मिळाले. पाच जागा या केवळ विखे पॅटर्नमुळे पक्षाला गमवाव्या लागल्या असल्याचा आरोप अनेकदा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर समोरच करण्यात आला होता. पाच जागा गेल्यामुळे व लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवूनही पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे हे पक्षात रमत नसल्याने निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजप सोडून स्वतंत्र विखे पॅटर्न राबविला जात असल्याने निष्ठावंत भाजपचे पदाधिकारी पक्षापासून दुरावत चालल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या भाजपजनांना स्वस्थ करण्याचे मोठे आवाहन नगर जिल्ह्याचे नवे प्रभारी असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्यासमोर असणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पाच जागा गमावल्याने भाजपमध्ये आली आहे मरगळ

नगरचेच प्रभारी पद का?
नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या राज्यातील प्रयोगानंतर दुसरा प्रयोग जिल्हा परिषदेत राबवण्यात आला. भाजपच्या सत्तेच्या कालावधीत आठ विधानसभा मतदारसंघ भाजपकडे होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला नगर जिल्ह्यात केवळ तीन जागा मिळाल्या. याचे शल्य अजूनही भाजपमध्ये आहे. त्यामुळे या पाच जागा पुन्हा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी पदी नियुक्ती केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विखे यांच्या दिल्लीतील वाढलेल्या वाऱ्यामुळे अस्वस्थता
पहिली सहकार परिषद भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी लोणीत घेतली. थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशचे सर्व नेते उपस्थित होते. अधूनमधून विखे यांच्या वाढलेल्या दिल्लीतील वाऱ्यामुळे भविष्यात विखेंचे हेच वाढलेले संबंध डोकेदुखी ठरण्याची शक्यता गृहीत धरून भाजपने थेट नगरवर थेट विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभारी पदाच्या नियुक्तीने वॉच ठेवला जाणार आहे.

तीन जिल्हाध्यक्ष, तरी पक्षाची वाताहत
नगर जिल्हा भाजपमध्ये प्रथमच उत्तर व दक्षिण असे स्वतंत्र जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले. दोन ग्रामीण जिल्हाध्यक्ष व एक शहराध्यक्षपद असतानाही भाजपची वाताहात होत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यामुळे ऊठ-सूट जाहीर वक्तव्य व काही प्रदेश स्तरावरील नेत्यांच्या नावाने एकेरी उच्चार करणाऱ्यांवर काहीसा लगाम लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...