आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांचे स्टिंग ऑपरेशन:देवेंद्र फडणवीसांनी दिलेला 'पेन ड्राईव्ह बॉम्ब' खरा की खोटा? वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

शिर्डी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशनचं पेन ड्राईव्ह सादर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. पण, कोणत्याही इलेक्ट्रिक डिव्हाईसमध्ये फेरफार होऊ शकतो, त्याचा योग्य तपास होऊ द्या, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

शिर्डीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी एसटी संप आणि राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी बोलताना फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर आंबेडकर यांनी शंका उपस्थितीत केली आहे. 'कोणत्याही इलेक्ट्रिक डिव्हाईसमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत याचा फॉरेन्सिक विभागाकडून योग्य तपास होत नाही, ते फुटेज नीट तपासले जात नाही. आणि तो पर्यंत त्याचा योग्य तो अहवाल येत नाही तोपर्यंत कुणीही यावर प्रतिक्रिया देणे हे राजशिष्टाचाराला धरून नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्‍हटलंय. तर एसटी संपाला पाठिंबा देणारा वंचित बहुजन आघाडी पहिला राजकीय पक्ष होता. अडचणीत येणार नाही एवढेच आंदोलन खेचण्याचा सल्ला आम्ही कर्मचाऱ्यांना दिला होता. पण उपटसुंभ कामगार नेत्यांच्या पाठीमागे लागल्याने आज एसटी कामगारांची फसगत झाली आहे. असंही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...