आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोभावे दर्शन मिळावे म्‍हणून:द्वारकामाईमध्ये भाविकांना प्रवेश देण्यात यावा : कोते

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र द्वारकामाईत भाविकांना दर्शनासाठी वरच्या भागात जाऊ द्यावे तसेच पूर्वीप्रमाणेच रात्रभर खुली करण्यात यावी, साईसमाधीवर लावण्यात आलेल्या काचा आणि जाळ्या काढून भाविकांना मनोभावे दर्शन घेऊ द्यावे, अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी सांगितले.

दरम्यान नुकतीच शिंदे गटाच्या माध्यमातून उत्तर नगर जिल्ह्याची कार्यकारिणी शिर्डी लोकसभेच खासदार सदाशिव लोखंडे यांनी जाहीर केली आहे.उत्तर नगर जिल्हाप्रमुखपदी शिर्डी शहरातील शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक कमलाकर कोते यांची निवड करण्यात आली आहे.साईसेवेसाठी वाहून घेतलेल्या श्री कोते यांनी जिल्हाप्रमुख पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम साईभक्तांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सदरील प्रश्नी तक्रार करणार असल्याचे सांगितले. यावेळी कोते म्हणाले, जागतिक किर्तीचे करोडो साईभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातील लाखो साईभक्त शेकडो किमीचा प्रवास करत दर्शनासाठी येत असतात. परंतु या भाविकांना साईमंदिरात समाधी स्थळाला लावलेल्या काचा आणी जाळ्यामुळे बाबांच्या पादुका व समाधीला स्पर्श करता येत नसल्याने भाविकांमध्ये असमाधानाचे वातावरण निर्माण होत आहे. दर्शनरांगेत तासंतास रांगेत ताटकळत बसलेल्या या भक्तांंना साईसमाधीला तसेच पादुकांना स्पर्श न करता आल्याने याचे प्रचंड दुःख वाटते. अशावेळी मात्र तथाकथित व्हिआयपी समजणारे लोक आपल्या ओळखीच्या लोकांसमवेत येऊन समाधीस्थळाच्या काचा काढून दर्शन घेतात, ही बाब योग्य नाही.हा सरासर भेदभाव आहे. हे कृत्य इतर भक्तांच्या भावनेला ठेच पोहोचणारे आहे. साईबाबांच्या मंदिरात ताटकळत दर्शनाची प्रतीक्षा करणार्‍या या भक्तांसाठी समाधी स्थळावर काच नसावी, म्हणजे त्यांना बाबांच्या पवित्र समाधीस स्पर्श करून पादुकांंना हात लावून आपल्या मनातील इच्छा प्रगट करता येतील. याचे मोठे समाधान करोडो साई भक्तांना मिळेल.त्याचप्रमाणे श्री साईबाबांच्या पवित्र द्वारकामाईत भाविकांना पूर्वीप्रमाणे दर्शनासाठी वरच्या चबुतऱ्यावर सोडण्यात यावेत आणी द्वारकामाई रात्रभर खुली ठेवावी. गुरुस्थानजवळील जाळ्या तसेच मंदिर परिसरातील रेलींग काढून परिसर मोकळा करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

बातम्या आणखी आहेत...