आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगर:धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त - इंदुरीकर महाराज

अहमदनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने माणूस मोठा होतो, याचे मूर्तीमंत उदाहरण धनूभाऊ, इंदुरीकर महाराज

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप रेणू शर्मा यांनी मागे घेतल्याने आता मुंडेंच्या पाठीमागचे संकट संपत असल्याचे बोलले जात आहे. धनंजय मुंडे-रेणू शर्मा हा वाद मिटत असतानाच मुंडे यांच्या समर्थनार्थ अनेकजण समोर येत आहेत. दरम्यान धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त आहे असे कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. त्यावेळी तेथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सुरु होते. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सुरु असल्याचे समजताच मुंडे कीर्तन ऐकण्यासाठी बसले. यावेळी धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त आहे, तसेच संतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने माणूस मोठा होतो, याचे मूर्तीमंत उदाहरण धनूभाऊ आहेत, असेही इंदुरीकर महाराज यावेळी म्हणाले