आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत धनश्रीला सुवर्णपदक तर भाग्यश्रीला रौप्य

श्रीगोंदे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली रोहतक येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालय व इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदे येथील सख्या बहिणी धनश्री फंड ५७ किग्रॅ वजनगटात दोन उल्लेखनीय कुस्त्या करत हरियाणाची अंजली बरोबर अटीतटीच्या लढतीमध्ये ११-८ फरकाने पराभूत करत सुवर्णपदक मिळवले. तर भाग्यश्री फंड हिने ५९ किग्रॅ वजनगटात उल्लेखनीय दोन कुस्त्या करून अंतिमसामन्यात प्रवेश मिळवला. परंतु तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, माजी आमदार राहुल जगताप, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, उपप्राचार्य प्रा. डॉ. झरे, उपप्राचार्य शहाजी मखरे, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिमखाना प्रमुख संजय अहिवळे, क्रिडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव, शारीरिक संचालिका कल्पना बागुल, नवीन पुनिया, हनुमंत फंड यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...