आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:एसटी आगारातील वाहन परिक्षक धनवटे यांचा सेवानिवृत्त बद्दल सत्कार

जामखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड येथील एसटी आगारातील वाहन परिक्षक हनुमंत भगवान धनवटे हे शनिवारी निवृत्त झाले. त्या अनुषंगाने आगाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, योगायोगाने आमदार राम शिंदे यांचा १ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार शिंदे, आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप, सहाय्यक वाहतूक निरीक्षक महादेव ढगे, जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप, कष्टकरी जनसंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गावडे, आपचे जिल्हा संयोजक संतोष नवलाखा, तालुकाध्यक्ष प्रवीण घायतडक, सचिव बाळासाहेब घाडगे, रामकिसन जायभाय, एकनाथ जायभाय, एस. एन. राख, विलास कांबळे, बाळासाहेब घुले, भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवक अध्यक्ष शरद काले, मनोज कुलकर्णी, जिल्हा चिटणीस मनेष मासाळ, नितीन धनवटे, सलीम बागवान, उध्दव हुलगुंडे, तुषार बोथरा, मोहन गडदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...