आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तव्य:धर्मवीर प्रतिष्ठानचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी : उपजिल्हाधिकारी निचित

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नि:स्वार्थी मनाने व लाज न बाळगता धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे युवक दर रविवारी स्वच्छतेचे कार्य करतात. प्रतिष्ठानचे हे कार्य इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी काढले. आठवड्यातून एक दिवस एक तास अशा मोहिमा युवकांनी सुरू केल्यास प्रशासकीय यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे अजय चितळे व त्यांचे सहकारी ८७ आठवड्यांपासून अखंडितपणे स्वच्छतचे कार्य करत आहेत. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी सप्त्नीक रविवारी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी घेतला. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सरकारी यंत्रणा सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही. तसेच स्वच्छतेच्या या कार्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. या उद्देशाने प्रतिष्ठानच्या वतीने दर रविवारी ही मोहीम राबविली जात असल्याचे चितळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...