आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:मनोरुग्ण बाबल्याचा कोतवालीसमोरच धिंगाणा; तीन दुचाक्यांचे नुकसान, पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका ‘बाबल्या’ नामक माथेफिरूने मंगळवारी (५ एप्रिल) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यासमोर धिंगाणा घालत तीन वाहनांची तोडफोड केली. या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले आहे.माथेफिरू असलेल्या ‘बाबल्या’ने कोतवाली पोलिस ठाण्यासमोर रस्त्यावर आरडाओरडा सुरू केला. त्याने दगड उचलून तेथे असलेल्या दुचाकीवर टाकला व गाड्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर बाजूला उभा असलेल्या आणखी एका गाडीवर त्याने दगड घातला. नागरिकांनी त्याला अटकाव करत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकारामुळे रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. अनेक दुचाकीस्वारांनी तेथून पळ काढला. यामुळे काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती.

बातम्या आणखी आहेत...