आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरणारा गजाड:धूमस्टाईल मंगळसूत्र चोरणारा गजाआड

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात आठ ठिकाणी चेन स्नेचिंगचे गुन्हे करणारा एक आरोपी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीकडून आठ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून फिर्यादी शैला सिताराम पाटील यांचे मंगळसूत्र धूमस्टाईलने चोरून नेल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत असल्याने आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्या होत्या. आरोपींचा शोध सुरू असताना दोन आरोपी केडगाव बायपासने मनमाडकडे जात असल्याची माहिती निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे सापळा लावून पथकाने एकाला ताब्यात घेतले. तर त्याचा दुसरा साथीदार दुचाकीवरून उडी मारून पसार झाला.

अटक केलेला आरोपी हा अल्पवयीन असून त्याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे, आदींनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...