आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:सावेडीत पुन्हा धूमस्टाइल चोरी, मंगळसूत्र पळवले; तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिलेच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबडून नेले. सोमवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास सावेडी उपनगरातील सहकारनगरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणी राजेंद्र शेळके (वय ५०, रा. वृंदावन कॉलनी, सोनानगर चौकाजवळ) यांनी फिर्याद दिली आहे.

शेळके या सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास सहकारनगरमधील मेघराज कॉलनीमधून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण बळजबरीने ओरबडून नेले. त्यांनी आरडाओरडा केला असता चोरटे दुचाकीवरून सुसाट गेले.

बातम्या आणखी आहेत...