आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घट:मागणीच्या तुलनेत डिझेलच्या पुरवठ्यात 30 टक्क्यांनी घट ; केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करणार

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसांपासून डिझेलचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख तीन डेपोतून डिझेलच्या पुरवठ्यात मागणीच्या तुलनेत तीस टक्क्यांनी घट येत असल्याने अनेक पेट्रोल पंपावर सध्या डिझेलची टंचाई भासत आहे. याबाबत पेट्रोल डिझेल असोसिएशनची बैठक झाली. यात केंद्र सरकारला पत्र लिहून शंभर टक्के डिझेलचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष चारुदत्त पवार यांनी दिली. पवार म्हणाले, जिल्ह्याला मनमाड येथील पानेवाडी, नगर तालुक्यातील अकोळनेर व पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथून इंधन पुरवठा केला जातो. पंधरा दिवसांपूर्वी डिझेल पुरवठा करणाऱ्या या तीन डेपोतून मागणीच्या तुलनेत १० ते २० टक्के कमी प्रमाणात डिझेल पुरवले जात होते. गेल्या आठवड्यात मागणीच्या तुलनेत तीनही डेपोतून ३० टक्के कमी डिझेल पुरवठा केला गेला. २० ते २५ रुपये अतिरिक्त दराने विक्री करावी लागत आहे. आम्हाला परवडत नाही असे कारण डेपो चालकांनी दिले. जिल्ह्यात ३५० पेट्रोल पंप आहेत. कमी प्रमाणात डिझेल पुरवठा होत असल्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोल पंपावरही झाला आहे.

केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करणार महाराष्ट्रात डिझेल पुरवठा कमी केला जात आहे. त्याचा परिणाम शेती व्यवसायावर होणार आहे. कमी प्रमाणात डिझेलचा पुरवठा केला जात असल्यामुळे पेट्रोल- डिझेल असोसिएशनची बैठक घेऊन चर्चा केली. लवकरच याबाबत आम्ही केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करणार आहोत, असे चारुदत्त पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...