आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर जखमी:सावंगा नाल्याजवळ उभ्या ट्रकला दिली कारने धडक ; तीन गंभीर जखमी

दिग्रस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस तालुक्यातील सावंगा नाल्या जवळ उभ्या ट्रकला कारने धडक दिल्याने चालकासह दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.१६ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ७ वाजताच्या दरम्यान घडली.सविस्तर वृत्त असे की, नागपूरवरून मारुती सुझुकी क्रमांक एम एच २९ डीसी २८०४ चारचाकी वाहनाने दिग्रसकडे येत असताना दिग्रस आर्णी मार्गावरील सावंगा बु जवळील नाल्या जवळ समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशामुळे चारचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर उभ्या असलेल्या सिमेंट भरलेल्या ट्रक क्रमांक एम एच २६ एडी २५७८ ला मागून जबर धडक दिल्याने पत्रकार चालक हनुमान रामावत (वय- ४५) रा. गजानन टॉकीज जवळ दिग्रस, बुटले महाविद्यालयाचे प्राध्यापक विजय रोठे (वय-४७) व त्याची मुलगी कु.सई रोठे (वय-१३) रा.लक्ष्मीनगर दिग्रस हे गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता प्रकृती चिंताजनक वाटत असल्याने दिग्रस आरोग्यधाम येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघात एवढा भीषण होता की चार चाकी वाहनाचा प्रथमदर्शनी भाग पूर्ण चुराडा झाला आहे. ट्रकच्या पुढील चाक पंचर असल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा होता. त्या ट्रकला कोणतेही रेडियम नसल्याने चारचाकी वाहन चालकाला ट्रक न दिसल्याने हा अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे.

बातम्या आणखी आहेत...