आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज वितरण:दीपक कांबळे यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार

नगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इब्टा संघटनेच्यावतीने दिला जाणारा, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार दिव्य मराठीचे रिपोर्टर दीपक कांबळे यांना जाहीर झाला आहे. तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्री फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहळकर यांनी घोषीत केले. शुक्रवारी (९ सप्टेंबर) श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती ईब्टा बहुजन मंडळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे यांनी दिली.

कोरोना कालावधीत केलेली धाडसी शोध पत्रकारिता व विविध वृत्त मालिकांच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल, पत्रकार कांबळे यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. तसेच समाजप्रबोधनकार पुरस्कार प्रशांत चव्हाण यांना घोषीत झाला आहे. तर आदर्श शिक्षक पुरस्कार : बबन वेताळ, सुरेंद्र हातवळणे, राजेंद्र फापाळे, सतीश शिंदे, सोपान शिंदे, संतोष थोरात, संतोष नगरे, विजय खाकाळ, अकबर हुसेन सय्यद, भाऊसाहेब भिंगारदिवे, शिवाजी कलगुंडे, संदिप बोत्रे, किरणकुमार अरुण बनकर, मारुती साळवे, किशोर रायकर, तर आदर्श शिक्षीका पुरस्कार : अनिता देशमुख, युगंधरा पाडळे, सविता वडवकर, शोभा लंके, अर्जुन महाडिक, शैला मराळे, भावना मोहिते, छबाबाई जाधव, मनीषा कातोरे, शुभांगी ईश्वरे, सुवर्ण गायकवाड, उज्वला शिंदे, उज्वला भंडारे, ज्योती गोरे, शुभांगी आंधळे यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, इब्टा संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहळकर आदी उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...