आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला बेपत्ता प्रकरण:शिर्डीमध्ये मानवी तस्करी, अवयव चोरी रॅकेटचा संशय, पोलिस महासंचालकांना तपासाचे आदेश

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 वर्षांत 279 बेपत्ता, कोर्टाचे पोलिस अधीक्षकांवर ताशेरे

इंदूर येथील दीप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ताप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने शिर्डी पोलिस आणि अहमदनगरच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत स्पष्ट शब्दांत तीव्र नापसंती व्यक्त करत फटकारले आहे. पोलिसांचा तपास धूळफेक करणारा असून नगरचे जिल्हा पोलिस प्रमुख तपासात सपशेल अपयशी ठरत त्यांच्या निष्काळजीपणावरच ठपका ठेवला आहे. शिर्डीत गेल्या चार वर्षांत तब्बल २७९ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून येथे मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का, याचा आता राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी तपास करावा, असा आदेशही दिला आहे

या संपूर्ण तपासाचा अहवाल नगर पोलिसांकडून औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर सुनावणीदरम्यान हा अहवाल न्यायालय स्वीकारू शकत नाही. जिल्हा पोलिसप्रमुख मनोज पाटील यांनी याप्रकरणी न्यायालयाला काहीही कळवण्याची तसदी घेतली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

२२० पानी अहवाल ठरला निरर्थक
पोलिसांनी २२० पानी जो अहवाल सादर केला आहे तो न्यायालयाने निरर्थक ठरवला आहे. कोर्टाने यापूर्वी सलग दोनदा मानवी तस्करी किंवा अवयव चोरीच्या अंगाने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना पोलिस अधीक्षकांना दिल्यानंतरही तसा तपास केल्याचा चकार शब्दही अहवालात नाही. पोलिसांनी अतिशय निष्काळजीपणे या गंभीर प्रकरणाचा तपास केल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.

पोलिसांनी हायकोर्टात दिलेली शिर्डीतून बेपत्ता व्यक्तींची आकडेवारी
वर्ष बेपत्ता तपास बाकी

२०१७ ७१ २०
२०१८ ८२ १३
२०१९ ८८ १४
२०२० ३८ २०

विशेष पथकाकडून तपास अहवालाचे होते आदेश
सुनावणीदरम्यान खंडपीठाने नगर पोलिसांना या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ११ सप्टंेबर २०१९ रोजी नगर पोलिसांनी सादर केलेल्या अहवालावरून उच्च न्यायालयाने शिर्डीतून एकूण ८८ जणांच्या बेपत्ता होण्यामागे अवयव चोरी अथवा मानवी तस्करी करणारे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास करण्यासाठी नगरच्या पोलिस प्रमुखांनी विशेष पोलिस पथकाची निर्मिती करून तपास करण्याचे आदेश देत अहवाल खंडपीठाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते

दर्शनासाठी येतात, बेपत्ता होतात
बेपत्ता महिलांमध्ये विवाहित महिला व मुलींचे मोठे प्रमाण असून हे बहुतेक सर्व महाराष्ट्राबाहेरील आहेत. दर्शनासाठी शिर्डीत आल्यानंतर बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

तपास योग्य नसल्याने दाखल केली याचिका
दीप्ती सोनी १० ऑगस्ट २०१७ ला शिर्डीतून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने दीप्ती यांचे पती मनोज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.