आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्ग:12 टीएमसी पाण्याच्या विसर्ग, तरी जिल्ह्यात 51,000 दलघफू पाणी

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात आतापर्यंतच्या सरासरी ३४० मिमिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील बहुतेक मोठी धरणे भरली आहेत. सर्वात मोठ्या मुळा धरणातील जलसाठा ९८.५३ टक्के तर भंडारदरा धरण १०० टक्के भरले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांतून तब्बल १२ टीएमसी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला असला तरी जिल्ह्यातील सर्व धरणांत तब्बल ५१ टीएमसी जलसाठा आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये हा साठा अवघा ३७.५ टीएमसी होता.

मागील वर्षी २० ऑगस्ट २०२१ पर्यंत ३१६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती, यंदा आतापर्यंत ३४० मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांत मुबलक साठा आहे. त्यामुळे यंदा शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. सद्यस्थितीत मुळा, भंडारदरा व निळवंडेतून विसर्ग सुरू आहे.

सद्यस्थितीतील विसर्ग
रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार प्रवरा पात्रात भंडारदरा धरणातून ३५७९, निळवंडे धरणातून ४८७१ क्युसेक, ओझर बंधाऱ्यातून ५६६१ क्युसेक प्रवरा पात्रात विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीपात्रात नांदूर मध्यमेश्वरमधून १२६६०, मुळा धरणातून ३००० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

धरणांतील साठा (दलघफू)
भंडारदरा १०७३९, निळवंडे ७१५४, मुळा २५६२०, आढळा १०६०, घोड ४८७३, सीना १८४७, खैरी ३६८, विसापूर ८७९ तर टाकळीभान धरणांत १९७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील लहान प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

तालुकानिहाय झालेला पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत नगर ३३६, पारनेर ३३१, श्रीगोंदे ३१८, कर्जत ३३५, जामखेड ३३७, शेवगाव ३३८, पाथर्डी ३२४, नेवासे ३२०, राहुरी ३२९, संगमनेर २८६, अकोले ५५२, कोपरगाव ३५७, श्रीरामपूर २८५, राहाता २८५ असा एकुण सरासरी ३४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोणत्या धरणातून किती पाणी सोडले?
नवीन पाण्याची आवक व धरणातील जलसाठा नियंत्रीत करताना पाटबंधारे विभागाने नदीपात्रात विसर्ग सोडला आहे. आतापर्यंत भंडारदरा धरणातून तब्बल ३ हजार ५७९ दलघफू, निळवंडे धरणातून ५ हजार ६७५ दशलक्ष घनफूट, मुळा धरणातून २ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडले आहे.

बातम्या आणखी आहेत...