आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:कोल्हे कुटुंबावर केलेल्या आरोपांचा खुलासा करा, अन्यथा काळेंवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; पराग संधान यांची टीका

कोपरगाव शहर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव शहरकाळेंचे आरोप सर्व बिनबुडाचे आहे. त्यांना फक्त कोल्हेंचे नाव घेतल्याशिवाय दुसरे काही सुचत नाही तसेच त्यांचे मंत्रालयात वजन देखील वाढत नाही. आमच्यावर पाणी प्रश्नी केलेले आरोप त्यांनी सिद्ध करावे. आम्ही कधी व कशासाठी कोणते वकील लावले त्यांची नावे सांगा, अन्यथा आम्ही त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असे पराग संधान यांनी सांगितले.

कोल्हे कुटुंबावर नुकतेच विरोधकांकडून पत्रकार परिषद, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाणी प्रश्नाबाबत आरोप करण्यात आले होते. याबाबत बुधवारी भाजप संपर्क कार्यालयात खुलासा करताना पत्रकार परिषदेत संधान बोलत होते. यावेळी भाजप नेते पराग संधान, दत्ता काले, स्वप्नील निखाडे, रवींद्र पाठक, विवेक सोनवणे, वैभव गिरमे, रवींद्र रोहमारे, बापू पवार, सचिन सावंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

संधान म्हणाले, कोल्हे कुटुंबावर विरोधकांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून शेतकऱ्यांनी त्यांच्या सिंचनाच्या पाण्यासाठी याचिका केलेली आहे. ती तळ्याची नाही. मात्र, काळे यांना कोल्हेंवर आरोप केल्याशिवाय त्यांची राजकीय गाडी देखील पुढे जात नसून त्यांचे मंत्रालयात वजन देखील वाढत नाही. काळेंनी कोल्हे यांची जिरवाजिरवीच्या नादात कोपरगावकरांची जिरवली. आम्ही पाच नंबर तलाव व निळवंडेला कधीही विरोध केलेला नाही आणि भविष्यातही नसेल. काही काळे प्रेमी यांनी सांगितले की आठ वकील लावले हे जर सिद्ध केले नाही, तर अब्रू नुकसानीचे गुन्हे दाखल करणार आहे. कोपरगावच्या हक्काचे पाणी माजी आमदार अशोक काळे यांच्या काळात गेले. आमदर आशुतोष काळे आता श्रीसाई संस्थांनचे अध्यक्ष असून त्यांना विनंती आहे की त्यांनी निळवंडे पाणी पाइपलाइन करावी व निळवंडेला काळे यांनी केलेल्या विरोधाचे पाप त्यांनी निळवंडेचे पाणी आणून शहरावर केलेले पाप धूवून काढावे, असेही संधान म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...