आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय कॉर्फबॉल स्पर्धेत दिशान गांधी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गांधी परिवारातर्फे गौरव करण्यात आला. दिशान यांनी यापूर्वी बास्केटबॉल क्रीडा प्रकारात चांगली कामगिरी करत, विद्यापीठ संघात स्थान मिळवले होते. कॉर्फबॉल क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य सिद्ध करून, थेट भारतीय संघात स्थान मिळवले. त्याच्या कामगिरीमुळे भारतीय संघ आता थेट जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. देशाची मान उंचावणारी चमकदार कामगिरी करणारा दिशान हा गांधी परिवाराचा कोहिनूर हिरा असल्याचे सांगितले. थायलंड येथे झालेल्या आशिया ओशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय कॉर्फबॉल संघाने पाचवा क्रमांक पटकावला व भारत जागतिक चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला.
या स्पर्धेत भारतीय संघाकडून दिशान गांधी याने सर्व सामने खेळले. दिशानवर फुलांचा वर्षाव करून ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी राजेंद्र गांधी, अरूणा गांधी, संजय गांधी, शारदा गांधी, किशोर गांधी, बबिता गांधी, प्रमोद गांधी, स्वाती गांधी, पवन, श्रुती, सिध्दी गांधी, अलका गुगळे उपस्थित होते. सिध्दी गांधी म्हणाली की, आम्हा सर्व भावंडांना दिशानच्या कामगिरीचा अभिमान वाटतो.
त्याला थायलंड येथील स्पर्धेवेळी देशाचा तिरंगा घेवून पाहिले तेव्हा खूप आनंद झाला. तो आमच्यासाठी आदर्शवत आहे. दिशान गांधी म्हणाला की, लहान पणापासून माझ्यावर आई वडीलांसह परिवाराने संस्कार केले. त्यांचे प्रोत्साहन पाठबळ यामुळेच खेळातही प्रगती करू शकलो, असे सांगितले. स्वाती गांधी यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.