आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन सदस्यांना संधी मिळण्यासाठी जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिली. कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पटारे म्हणाले, छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या आदेशाने तीन वर्षापुर्वी नगर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर केली होती. संघटनेच्या नियमानुसार दर तीन वर्षांनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन सदस्यांना काम करण्यासाठी संधी देण्यात येते.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाब काळे व विधार्थी प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे यांच्या आदेशाने जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील म्हणाले, या संघटनेकडे युवकांचा कल वाढलेला आहे. आपली संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. अगामी काळात संघटना बांधणी करून अखिल भारतीय छावा संघटनेचे पुढील अधिवेशन जिल्ह्यात घेण्यासाठी केंद्रीय कार्यकारणीकडे मागणी करू.नवीन कार्यकारणी सोमवार २६ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी नवीन सभासद नोंदणी, पदवाटप, विद्यार्थी आघाडी, कामगार आघाडी, वाहतुक अघाडी, शेतकरी आघाडी, युवक आघाडी, महिला आघाडी स्थापन करणे. प्रत्येक तालुक्यात शाखा उघडून गाव तिथे छावा संघटनेची शाखा या विषयवार बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस नितीन पटारे, देवेंद्र लांबे, अविनाश सातपुते, दादा बडाख, बहिरनाथ गोरे, प्रवीण देवकर, अमोल वाळुंज, शरद बोंबले, गणेश धुमाळ, किरण उघडे, भाऊसाहेब वाडेकर, गणेश गायकवाड, सुभाष मोरे, शैलेश धुमाळ, उमेश नवघरे, सुहास निर्मळ, ज्ञानेश्वर क्षीरसागर, संतोष कोल्हे, संतोष कुटे, निलेश बनकर, अक्षय पटारे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.