आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद व्हायरल:पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक यांचा वाद व्हायरल ; एक्का बादशाह नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती

मोताळा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुगार अड्डयावर टाकलेल्या धाडीतील रकमेवरुन पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस उपनिरीक्षक यांच्यातील वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला. बस स्थानकासमोरील लोखंडे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे काही जण एक्का बादशाह नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून १० जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेश आगाशे, नापोका संजय गोरे, पोकॉ ज्ञानेश्वर धामोडे व अभिनंदन शिंदे यांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी शे. इम्रान शे. बदरुद्दीन, जगदेव शंकर धुरंधर, प्रकाश लक्ष्मण धुरंधर व गजानन प्रल्हाद अढाव या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकुण ८३ हजार ८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.

जुगार खेळताना पकडलेला आरोपी म्हणाला फक्त एक हजार

जुगारात पकडलेला शे. इम्रान याने जबाबात लिहून दिले की, १२ जून रोजी भावाच्या दुकानावर असताना नितीन पुरभे हा आला. त्याने पकडले असताना तुझ्याकडून चाळीस हजार रुपये घेतले, असे तू ठाणेदार पाटील यांना सांग. परंतु शे. इम्रान याने ठाणेदार पाटील यांना जुगार खेळताना माझ्याकडे १ हजार २०० रुपये होते, असे सांगितले. प्रकाश धुरंधर यांनी जबाबात लिहून दिले की, पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावेळी माझ्या जवळील रोख १ हजार ५०० रुपये पोलिसांनी जप्त केले होते. त्यानंतर १२ जून रोजी बोराखेडी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. यावेळी ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी जुगारात जप्त करण्यात आलेल्या पैशांसंबंधी चौकशी केली. त्यावेळीही १ हजार ५०० रुपये पोलिसांनी जप्त केल्याचे त्याने सांगितले. त्यावर ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी वीस हजार रुपये असल्याचे सांगितल्यास मी तुमची दुचाकी सोडून देतो, असे आश्वासन दिल्याचे व्हायरल सत्य की असत्य याबाबत चर्चा रंगली आहे.

बातम्या आणखी आहेत...