आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:खांडगावात दोन गटांत वाद; 26 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागेच्या वादातून दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. बदामाचे झाड तोडून, सलून दुकान व शौचालयाची मोडतोड करण्यात आली. खांडगाव येथे मंगळवारी (ता. ३) दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. याबाबत परस्पर फिर्यादींवरून २६ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.राजेंद्र यादव सस्कर यांच्या फिर्यादीवरुन १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यात जनार्दन गुंजाळ, संदीप गुंजाळ, दत्तू तुकाराम गुंजाळ, विलास गुंजाळ, भानुदास गुंजाळ, बादशहा गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, सचिन गुंजाळ, अमोल भानुदास गुंजाळ, संकेत गुंजाळ, शुभम गुंजाळ, नितीन गुंजाळ, अजित गुंजाळ, महेश गुंजाळ, अमित गुंजाळ व अन्य पाच महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. दुसऱ्या गटातर्फे जनार्दन गुंजाळ यांच्या फिर्यादीवरुन ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरुन राजेंद्र यादव सस्कर, संजय यादव सस्कर, सुभाष यादव सस्कर, प्रसाद संजय सस्कर, पुष्पा कमळाकर सस्कर, सुषमा राजेंद्र सस्कर, सुधाकर यादव सस्कर यांचा मुलगा (नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार जागेच्या वादातून घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...