आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:महावितरणच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणमार्फत केडगाव उपकेंद्रात देखभाल दुरूस्तीचे काम करण्यासाठी सावेडी उपकेंद्रातील पाणीपुरवठा फिडर बंद राहणार असल्याने शनिवारी (१७ डिसेंबर) उपनगर भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

शहर पाणीपुरवठा योजनेवरील वसंत टेकडी येथील विद्युत पुरवठा खंडीत राहिल्याने शनिवारी शहरातील मुकुंदनगर, सारसनगर, लक्ष्मीनगर, अर्बन बँक कॉलनी, सुर्यनगर, केडगाव उपनगराचा काही भाग, शिवाजीनगर, पाईप लाईन रोड आदी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. हावितरणमार्फत वसंत टेकडी येथील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर या भागातील पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, महावितरणकडून सातत्याने दुरुस्तीची कामे होऊनही वारंवार पाणी योजनेवरील वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...