आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Dissatisfaction Among The Citizens As There Is No Seating Arrangement In The Municipality; Arrangements Will Be Made Soon: Chief Santosh Landage |marathi News

गैरसोय:पालिकेत बसण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी; लवकरच व्यवस्था करण्यात येईल: मुख्याधिकारी संतोष लांडगे

पाथर्डी शहर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगर परिषदेच्या कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांना बसण्याची व्यवस्थाच नसल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे. बसण्यासाठीची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

नगर परिषदेत शहर व परिसरातील नागरिकांची विविध कामांसाठी नेहमी वर्दळ असते. मात्र कामकाजासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी खुर्ची अथवा बाके नसल्याने काम होईपर्यंत त्यांना उभे राहावे लागते. कधी संबंधित अधिकारी-कर्मचारी आपल्या टेबलवर उपस्थित नसतात.अशावेळी ते येईपर्यंत उभे राहून त्यांची वाट पाहावी लागते. तर अनेकवेळा अधिकाऱ्यांपुढे दुसरी कामे असल्याने नागरिकांना ताटकळतच त्यांच्यासमोर उभे राहावे लागते.पालिका कार्यालयात कामकाजासाठी येणारा प्रत्येक नागरिक हा करदाता असतो.

यामुळे करदात्याला बसण्याची व्यवस्था असायला हवी.मात्र याकडे पालिका प्रशासनाने गांभिर्याने लक्ष दिलेले नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विविध कामांसाठी नगर पालिका कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांसाठी खुर्ची व बाकांची व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे.याची दखल घेऊन लवकरच बसण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात येईल, मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...