आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैभवशाली परंपरा असलेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेला भ्रष्टाचारामुळे काळीमा फासण्याचा उद्योग लगेल्या काही वर्षात झाला आहे. मागील अडीच वर्षांत तालुक्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले, या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो. मात्र दुर्दैवाने जिल्हा परिषदेचे अस्तित्वच जाणवले नाही, अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली.
तालुक्यातील ५० लाखांची बोडखे ते ताजनापूर लिफ्ट व ४० लखांचे नवीन दहिफळ ते पिसोटे वस्ती या रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार राजळे यांच्या हस्ते झाला. त्यानिमित्त बोडखे येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बोडखेचे उपसरपंच पुंजाराम बर्डे होते. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिला आघाडी अध्यक्ष आशा गरड, सरचिटणीस भीमराज सागडे, सरपंच अनिता बर्डे, प्रदीप वेताळ, दादा कसाळ, बाळासाहेब वेताळ, कचरू वेताळ, भुजंगराव पाटील वेताळ, दत्तात्रेय शेळके, मच्छिंद्र वेताळ, संतोष बर्डे, कारभारी बर्डे, विनायक वेताळ, राजकुमार गोसावी, विष्णू धावणे, अंकुश आर्ले, बाळासाहेब वेताळ, सदाशिव बर्डे, नवनाथ अमृत, कैलास नजन, शंकर लंगोटे, दादासाहेब बर्डे, आत्माराम वेताळ, ग्रामपंचायत सदस्य ज्योती बर्डे, संगीता धावणे, आजिनाथ वेताळ, रामा तुजारे आदी उपस्थित होते.
आमदार राजळे म्हणाल्या, शेवगाव तालुक्याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद असूनही भरीव निधी मिळाला नाही. राज्य सरकारचा कारभारही भ्रष्ट असून त्यांनी विकासाचे व शेतकरी हिताचे एकही काम केले नाही. गेल्या सात वर्षांच्या कालावधीत मतांचा विचार न करता प्रत्येक गावात विकास निधी देण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, सुनील रासने यांचीही भाषणे झाली. विठ्ठल भिडे यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.