आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व महिला बालकल्याण विभागाकडून २०१८ ते २०२३ या कालावधीत खरेदी केलेल्या साहित्याची चौकशी करावी, यासह अन्य मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यासह ढिग़ावा ग्रामपंचायतचे उपसरपंच व ग्रामस्थांनी नगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ यांच्या नेतृत्वाखाली ढिग़ावा ग्रामपंचायतच्या उपसरपंच अनुराधा ठवाळ, गोपीनाथ दांगडे, सुनील पवार, रोहिदास दांगडे, रवींद्र गलांडे, मिलिंद कदम, रावसाहेब दांगडे, ज्ञानदेव शिंदे, बबन भैलुमे, बबन कदम आदी उपोषणात सहभागी झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला अनिल पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद समाज कल्याण, महिला बालकल्याण विभागाने खरेदी केलेल्या साहित्याची चौकशी होणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व चौदा विभागातील सर्व कामकाजाचे ऑडिट व्हावे अशा मागण्या या निवेदनात करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामकाजाची चौकशी करून त्यांची बदली करण्यात यावी. येरेकर हे जिल्हा परिषदेत आलेल्या पदाधिकाऱ्यांना किंमत देत नाहीत. असा आरोप ठवाळ यांनी केला. समाज कल्याण समितीने २०२१ -२०२२ ला ९ कोटीं चे क्रीडा साहित्य खरेदी ग्रामपंचायत हद्दीतील नवबौद्ध घटकांना हे साहित्य देण्याचे ठरवण्यात आले होते.साहित्य देखील वाटप झाले मात्र प्रत्यक्षात १९९ ग्रामपंचायत कोणत्या दलित वस्तीला हे साहित्य दिले हे सर्व संशयास्पद आहे. अनेक ग्रामपंचायत या दलित वस्ती सोडून निधीचा गैरवापर करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.