आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎जागृती:जि. प. विद्यार्थ्यांनी हाती घेतले‎ कॉपीमुक्त अभियानाचे फलक‎

‎नगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी व बारावीच्या परीक्षांना‎ सुरुवात झाली आहे. शासनाने‎ कॉपीमुक्त अभियान हाती घेतले‎ आहे. तथापि, जिल्ह्यातील विविध‎ केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस येत‎ आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा‎ परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी फलक‎ हाती घेऊन कॉपीमुक्त परीक्षा‎ अभियानाच्या जागृतीसाठी गावातून‎ फेरी काढली.‎ परीक्षेत कोणीही कॉपी करू नये,‎ यासाठी जिल्हा प्रशासनाने पथकांची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नेमणूक केली आहे.

ही पथके पेपर‎ सुरू होण्यापूर्वी विविध केंद्रांवर‎ जाऊन विद्यार्थ्यांची झडती घेतात.‎ तसेच पेपर सुरू झाल्यानंतर जर‎ कोणी कॉपी करताना आढळून‎ आल्यास कारवाई करत आहेत.‎ प्रशासनाने मोठा गाजावाजा करून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कॉपी मुक्त अभियानाची घोषणा‎ केली होती. परंतु, बारावीच्या‎ पहिल्याच पेपरला पाथर्डी केंद्रात‎ विद्यार्थी कॉपी करताना आढळून‎ आले. विद्यार्थ्यांमध्ये कॉपीमुक्तीचा‎ जागर करण्यात प्रशासनाला फारसे‎ यश आले नाही.‎

बातम्या आणखी आहेत...