आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्लेखनीय कार्य:आदर्श शिक्षकांसह सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना पुरस्कार वितरण

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आदर्श शिक्षकांसह सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना जिल्हा परिषद सदस्य माधव लामखडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. डोंगरे संस्था, नवनाथ युवा मंडळ, ग्रामीण विकास सेवा मंडळ व धर्मवीर वाचनालयाने नुकताच हा सन्मान केला.निमगाव वाघा (ता. नगर) येथील मिलन मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला. कोरोना काळातही शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान दिल्याने विद्यार्थी व सर्वसामान्य घटकांना आधार मिळाला. त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने संस्थेने पुरस्कार देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वागत प्रतिभा डोंगरे यांनी केले. लामखडे म्हणाले, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांमुळे समाज सावरला. कोरोना काळात समाजाची अवस्था अत्यंत बिकट होती.

मयत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी देखील कोणी पुढे येण्यास तयार नव्हते. या परिस्थितीमध्ये शिक्षकांनी विद्यादानाचे पवित्र कार्य केले. तर सामाजिक कार्यकर्त्यांनी गरजूंना विविध प्रकारे मदत देऊन आधार दिला. त्यांच्या कार्याचा सन्मान होण्यासाठी संस्थेने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. कवयित्री गुंफा कोकाटे यांनी दिवा पेटविण्यासाठी दिवा लावला पाहिजे.., झोपलेल्या गावासाठी मला जागले पाहिजे!... या काव्याला प्रेक्षकांनी दाद दिली.

सावित्रीबाई फुले व महात्मा फुलेंचा वारसा शिक्षक समर्थपणे पुढे घेऊन जात आहे. शिक्षण क्षेत्रात कार्य करताना समाजभान ठेऊन योगदान दिल्यास भावी सक्षम पिढी निर्माण होणार असल्याचे, त्या म्हणाल्या. तसेच शिक्षण व सामाजिक कार्यावर त्यांनी कविता सादर केल्या. शैलेंद्र भणगे यांनी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्काररुपी मिळणारे पाठबळ प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यावेळी भरत बोडखे, रंगनाथ सुंबे, बाबासाहेब महापुरे, प्रशांत जाधव, भाऊसाहेब डोंगरे, राजू हारदे, नाना डोंगरे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले. आभार संदिप डोंगरे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...