आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त:सेवा पंधरवड्यानिमित्त गावांत दाखले वाटप

शिर्डी9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारने आयोजित केलेल्या राष्ट्रनेते ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवड्या निमित्त तालुक्यातील विविध गावांत महसूल विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून शासकीय योजनांचे दाखले लाभार्थींना मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. शासकीय कार्यालयात विविध योजनांचे दाखले मिळवण्यात लागणारा विलंब आणि करावी लागणारी प्रतिक्षा यामुळे योजनांचा लाभ मिळण्‍यासही लाभार्थींना उशिर होतो. राज्य सरकारने या सर्व समस्‍येवर मात करण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरवड्या निमित्त गाव पातळीवर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

या माध्यमातून विविध योजनांचे दाखले गावातच देण्याचा उपक्रम यशस्वी ठरला आहे.दाखले थेट घरपोहोच मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे करीत आहेत. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या दाखल्यांचा प्रश्न निकाली लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी गती घेतल्याचे पाहायला मिळत आहे.