आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप‎:विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने मुलांना‎ शैक्षणिक साहित्याचे वाटप‎

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने‎ झोपडपट्टी, पालावरील मुलांना शैक्षणिक साहित्याचे‎ वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक‎ अंकुश आघाव, अ‍ॅड. अर्जुन काळे आदि उपस्थित‎ होते. समाजात आज अनेक अशी मुले-मुली शिक्षण‎ मिळणे हा त्यांचा हक्क आहे, परंतु आजही अनेक जण‎ यापासून वंचित आहेत, जे शाळेत जातात, परंतु‎ शैक्षणिक साहित्या अभावी त्यांच्या शिक्षणात खंड‎ पडत आहे.

हातावर पोट भरणारे, मोलमजूरी करणारे‎ पालक असल्याने शिक्षणाबाबत त्यांच्यामध्ये‎ उदासिनता आहे. त्यामुळेच विश्व सत्यशोधक‎ संस्थेच्या माध्यमातून अशा मुला-मुलींच्या सर्वांगिण‎ विकासासाठी काम करत आहे. या उपक्रमांतर्गत‎ नगरमधील भिंगार व परिसरातील मुलांना या शैक्षणिक‎ साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी‎ मोहन शिरसाठ, दीपक आघाव, सचिन आघाव,‎ पांडूरंग डमाळे आदिंचे सहकार्य लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...