आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक अपंग दिनानिमित्त नगर तालुक्यातील चास येथील मतिमंद मुलांच्या नवप्रेरणा वस्तीगृहातील मुलांना कॅरियर मायडियाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वस्तीगृह मध्ये १८ वर्षावरील मतिमंद मुलांचा समावेश असून लोकसहभागातून व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून हे वसतिगृह चालवले जाते. जागतिक अपंग दिनानिमित्त कॅरियर मायडियाचे व्यवस्थापक (एचआर) पंकज यादव यांच्या हस्ते या दिव्यांग मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
यावेळी वस्तीगृह चालक नानासाहेब भापकर, योगेश रोकडे, सरपंच मनीषा रोकडे, संदीप मगर, संदीप वाघमारे, गणेश साळवे, सरपंच तुकाराम कातोरे, के.के शेट्टी, सुनील जाधव, स्नेहल मोकळ, ज्योती मोकळ, गोपाल कृष्ण परदेशी,आदी यावेळी उपस्थित होते. यादव म्हणाले, मायडिया कंपनीने चास येथील वस्तीगृह दत्तक घेतले आहे. कंपनीच्या माध्यमातून एलईडी, टीव्ही रेफ्रिजरेटर उपलब्ध करून दिला आहे. आभार नानासाहेब भापकर यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.